आकाशवाणी
आकाशवाणी जनसामान्यांची वाणी,
चुंबकीय ध्वनी लहरी पोहचती दूरदूरपर्यंत,
खोलात जाऊन पाहिले तर विश्वात सर्वत्र याचीच पोहोच
जगभर त्यासाठी अंगण,
पोहचे घराघरात सहज,
करी दिवसाची सुरवात सुंदर
भावगीते, भक्तीगीतांची रेलचेल,
बातम्या चर्चासत्रे आणि सुगम संगीताची त्यास जोड,
ठराविक वेळेत सुरू होई
वेळेस अन वेळेवर अचूक अगदी,
देई साध्या सोप्या भाषेत माहिती,
कधी शेतीविषयक
कधी प्राण्यांच्या विषयक,
कधी आरोग्याच्या विषयक माहिती,
न अतिरंजित आहे तशी सुमधुर शब्दांचा वापर
न अतिरेक न धडकी बसवणारा आवाज,
सामान्य लोकांच्या हिताचा विचार,
निसर्गाचे चक्र पाळे
न चोवीस तास भडीमार,
न सातत्याने तोच तोच विषय,
हवामानाचे निरीक्षण आणि त्याची माहिती
निष्पक्ष अन बांधिलकी जपणारी वाहिनी,
आकाशवाणी जनसामान्यांची स्वतःची वाणी,
एक आदर्शवत एक अविस्मरणीय माध्यम
0 Comments