आरोग्यसेवा

वैद्यक शास्त्र

आरोग्यसेवा महत्वाची,
हवामानात बदल, प्रदूषण अन ताण तणाव,
याने ढासळे मनुष्याची प्रकृती

यासाठी आरोग्य पूर्वपदावर आणण्यासाठीची यंत्रणा,
देई औषधे,
करे उपचार

सुदृढ होईल शरीर,
हरे रोग,
सामान्य परी अत्यंत महत्वाची बाब

जोवर असे ठणठणीत,
तोवर न भासे जाणावे याचे महत्व,
आजारी मनुष्यासाठी मात्र देवाचा अवतार

करे निदान,
करे सुश्रुता,
भासल्यास करे शस्त्रक्रिया

मानवाच्या प्राथमिक गरजांपैकी एक बाब,
वैद्यकशास्त्र त्यावर करे दीर्घ अभ्यास,
नवनवीन शोधे औषधे अन उपचार

एक अघोषित युद्धाचे जणू सैनिक,
आरोग्यसेवा जीवनाचा संजीवनी मंत्र

No Comments
Post a comment