आशा

आशा

आशा एक दिशा,
जी नेई ध्येयाच्या दिशेने,
एक किरण जो उजळे मार्ग

जसा पहाटेचे सोनेरी किरण,
येताच सरतो अंध:कार,
तसेच आशेचे सरते दु:ख येई उत्साह

कार्याच्या दिशेने होते मार्गक्रमण,
यश भेटण्याच्या संधी वाढतात,
आत्मविश्वास दुणावे सहज

विजयाचा मार्ग होई सुकर,
आनंदाचा परिमळ असे सदैव सोबत,
मानवाचा एक उत्तम गुण

जो नेई यशपर्यंत,
संकटात देई साथ,
मानवाचा सोबती

एक उमेद जी देई यशाची खात्री,
आले अपयश तरी ठेवी उत्साही,
नव्याने लढण्याचे देई बळ

आशा आनंदाची नव्या नवलाईची,
सुखद वाटचाल,
जणू दैवी अंश त्यात

No Comments
Post a comment