इतिहास
इतिहास म्हणजे कालचा वर्तमान,
आधी काय घडले याची नोंद,
प्रत्येक गोष्टीचा असे इतिहास
कुणाचा जन्म,
कुणाचा मृत्यू,
कोणती लढाई
कोणता महापुरुष,
कोणती घटना,
काहीतरी मोठे संशोधन
कसली तरी नवनिर्मिती,
जे घडल ते ते,
मग घटना असो वस्तु वस्तु असो की मनुष्य
दाखवी दिशा,
देई ज्ञान,
लावता येई तर्क
घेता येई अंदाज,
जरी वाटले कंटाळवाणे परी घेता येई भविष्याचा वेध,
सामान्य परी असामान्य याचे कार्य
कधी घडली घटना,
कशा रीतीने अन काय हेतु त्यामागे,
साऱ्या प्रश्नांची उत्तरे
अगदी रुग्णाची देखील तपासली जाई आरोग्याचा पूर्वइतिहास,
त्यावरून वैद्य ठरवी कोणते द्यावे औषध,
अन कसा करावा उपचार
तसेच इतर प्रश्नांचा देखील उपाय शोधण्यासाठी लागे गरज,
असता ज्ञान होई उकल,
सुटे प्रश्न
0 Comments