ऊर्जा
कणाकणात ऊर्जा,
सर्व गोष्टी ऊर्जेचे स्वरूप,
मर्त्य असो की कोणी अन्य,
जळ असो की घन
जितकी जास्त ऊर्जाभारीत तितके घनस्वरूप,
अविनाशी,
आपणही त्याचेच स्वरूप
परम ऊर्जेचे सर्व अंश,
अन्न साखळी त्याचेच रूप,
सूर्याचा प्रकाश येई धरणीवर
त्यापासून अन्न तयार करे वनराई अन हरित जीव,
त्यांस खाऊन मनुष्य प्राणी अन पक्षी करे उदरभरण,
त्यांना खाऊन जगणारे देखील अनेक जीव
हीच साखळी चाले निरंतर,
प्रकाशकण देई बळ,
देई उत्साह करण्या कार्य
फळे अन अन्न तरी काय करे दुसरे,
अगदी ग्रह अन तारे देखील त्याचेच रूप,
जितके अधिक तितके तप्त,
काहीसे शांत होता ते कण
होई घनात त्यांचे रूपांतर,
सजीवत असे त्यांचे जागृत ऊर्जा,
तेच चल
ऊर्जेची अनेक रुपे,
प्रकाश असो की वारा,
एक तत्व सर्व त्यामुळे होई प्रत्येकाशी संपर्क
0 Comments