कला

कला

कला कल्पक अन सृजनशील प्रांत,
जिथे आनंदाचा अन चैतन्याचा वास,
सकारात्मक ऊर्जा

कल्पनेतून चित्र उतरे,
कलेतून नाना शिल्प घडे,
कुणी मूर्ती घडवे

कुणी नृत्य सादर करे,
कुणी सुमधुर गीत,
कुणी एखादे वाद्य उत्तम वाजवे

कुणी उत्तम हस्ताक्षर,
कुणी हस्तकला करे,
कुणी सुंदर रांगोळी

कुणी उद्यानाचे उत्तम व्यवस्थापन करे,
कुणी पाककलेत नैपुण्य दाखवे,
नाना कला अन नाना त्याचे अंग

कुणी नाटक सादर करे,
कला जणू जीवनाचा आनंदाचा प्रांत,
एक सिद्धी जी जिच्यात नवनिर्मितीचे सामर्थ्य

जी देई ओळख,
जी ठेवी सदैव आनंदात,
जन्मजात वसे काही प्रयत्नपूर्वक अंगी बाळगे

No Comments
Post a comment