कला – एक गुण
कला असे प्रत्येकात,
एक गुण जो देई जीवनाला अर्थ,
कुणाकडे असे गायनाची
कुणी उत्तम चित्रकार,
कुणी लेखक,
कुणी वादक
कुणी कवी,
कुणी संशोधक,
कुणी नृत्य करे सुंदर
कुणाकडे भाषण कौशल्य,
कुणाकडे शरीत सौष्ठव,
कुणी रचनाकार
ह्या गुणामुळे त्याची ओळख,
त्याची घडे कारकीर्द,
देई समाजाला दिशा त्या कलेतून
काही जणांमध्ये एकाहून अधिक कलागुण,
ओळखणे काहीसे सोपे,
ज्यात आवड अधिक
जे होई कार्य उत्तम,
जे न वाटे काम,
ती कला घडवू शके जीवन
0 Comments