कलेचे विश्व
कलेचे विश्व भलतेच व्यापक,
नाना कला,
प्रत्येकात वसे
कुणास येई चित्तारता उत्तम चित्र,
कुणास येई उत्तम गाता,
कुणी वाजवे उत्तम वाद्य
कुणी खेळात उत्तम,
कुणी हस्तकलेत उत्तम,
कुणी उत्तम लेखक
कुणी कवी,
कुणी यंत्र तयार करे भन्नाट,
कुणाकडे उत्तम स्थापत्यकला
कुणी उत्तम वाहन चालावी,
कुणी उत्तम उद्योग करे,
कुणी गणितात निपुण
कुणी शिल्पकलेत पारंगत,
प्रत्येकजण कुठल्या न कुठल्या कलेत परिपूर्ण,
प्रत्येकाकडे वसे कलागुण
खरतर तोच जीवनाचा योग्य मार्ग असे,
त्यात व्यक्ती समाजासाठी उत्तम योगदान देऊ शके,
कलेचे विश्व सखोल अन रम्य
कुणी आजूबाजूच्या ब्रह्मांडातील एखादा ग्रह शोधून काढे,
कुणी खनिज,
कुणी वैज्ञानिक,
अनंत कलेच्या विश्वाचा विस्तार,
कला मानवाचा उत्तम गुण
0 Comments