कृत्रिम बुद्धिमत्ता
कृत्रिम बुद्धिमत्ता महत्वाचा विषय,
स्वयंचलित वाहने अन विमाने,
द्रोण अन रणगाडे
यंत्रमानव करे सांगेल ती कामे,
यंत्राचे प्राणी देखील अस्तित्वात,
शेतकामात देखील त्यांचा मोठा सहभाग
जणू माणसाला पर्याय,
करे अचूक कार्ये,
अथक अन बुद्धिमान
चित्रकला असो की काव्य,
संज्ञावळी असो की उपयोजक,
सर्व करे सहज
काही क्षेत्रात अजूनही बाल्यावस्थेत,
परी वेग मात्र माणसापेक्षा अधिक,
माणसाचा एक उत्तम सहाय्यक
करी कार्ये पूर्ण,
करे माणसाचे श्रम कमी,
जवळपास प्रत्येक क्षेत्रात याचा वावर
अगदी शस्त्रक्रियेत देखील करे अचूक काम,
शिक्षणात देखील याचा वावर,
प्रत्येक प्रांतात वाढे त्याचा अंमल
भविष्यात परग्रहावर देखील पाऊल टाकेल,
आता करे वाहने तयार,
भविष्यात करेल तो स्वतःला तयार
कृत्रिम बुद्धिमत्ता माणसाला सहाय्यक,
अनेक क्षेत्रात आव्हानात्मक,
सध्या तरी तो माणसाचा एक उत्तम मदतनीस
0 Comments