गणपती

गणपती बुद्धीचा देव,
गणांचा अधिपती,
प्रथम देव

गजस्वरूप सर्वांचा लाडका,
पुजिला जातो सर्वात आधी,
तो त्याचा बहुमान

सुंदर ते वदन,
आनंददायी त्याचे आगमन,
महाराष्ट्राच दैवत

नाना रूपात अवतरे,
नाना प्रकारे त्याचे पूजन,
नसे कोणते बंधन

जाणावे त्याचे अस्तित्व,
घरोघरी त्याचे पूजन,
सुखाकर्ता दुखाहर्ता शब्दश:

सोबत येई हत्ती नक्षत्र,
धो धो कोसळे पाऊस,
रमणीय वातावरण

लंबोदर त्याचे लंब उदर,
देवाचे बाळ स्वरूप,
कुणासही आवडे असे त्याचे रूप

गणपती सोबत मूषक,
तेही जणू कोडेच,
तिथेच बुद्धिमत्तेचा कस

त्याचे आवाहन या प्रसंगी,
दे बुद्धी इतकी की करू शकू प्राप्त ध्येय,
कोट्यवधी रचाव्या कविता,
जगातील सर्वाधिक काव्याचे ठरो स्थळ

No Comments
Post a comment