गणित

गणित

गणित सगळीकडे,
गणिताचे जग,
वेळ, काळ आणि व्यवहार

उंची रुंदी अन वजन,
आर्थिक संस्था अन बांधकाम क्षेत्र,
सगळीकडे गणिताने व्यापले आभाळ

दोन ठिकाणांमधील अंतर,
मोजणी असो की आर्थिक व्यवहार,
खरेदी असो की विक्री

संगणकीय प्रत्येक घडामोड,
प्रत्येक शब्दांची साठवणूक,
दृकश्राव्य माध्यमातून एकमेकांशी संभाषण

वय अन तापमान,
परीक्षेतील गुण,
खेळांमधील नियम

सगळीकडे गणिताचे राज्य,
अगदी दोन व्यक्तीतील चर्चा देखील चाले गणिताच्या भाषेत,
क्षेत्रफळ आणि घनता

ग्रहांमधील अंतर,
प्रकाशाचा वेग सर्व गणले जाई गणितात

No Comments
Post a comment