जतन
जतन करण्याचे महत्व अपार,
होई पुनर्वापर वाचे वेळ,
होई कार्ये झटकन
नाहीतर पूर्वीच्या पदावर,
दिवस दिवस काम करतो,
संपता महिना येई वेतन खात्यात
पुढील महिन्यात जाई खर्च होवून,
अर्थ इतकंच की पुन्हा येई मूळपदावर,
अशाने न जाई गाडी पुढे
जसा एखादा राजा करे साम्राज्याचा विस्तार,
वाढावे धन करे प्रजेस सुखी,
देई चालना ज्ञान अन तंत्रज्ञानास
पुढील पिढीस त्याचा उपयोग होई,
करता जतन त्या ज्ञानाचे,
वाचे श्रम नव्याने करण्याचे
संगणकीय क्षेत्रात तर पुनर्वापर हाच दंडक,
तोच मोठा फायदा यात,
थोड्याफार फरकाने सगळीकडे जतनास महत्व
संस्कृती असो की ज्ञान,
भाषा असो की कार्य,
जतनाचे फायदे अधिक
पिढ्यानपिढ्यांचे हे संचित,
असामान्य बाब,
टिकवणे आपल्या हातात
0 Comments