ज्ञान
ज्ञानाचे भांडार चोहीकडे,
ज्ञान जितके घेईल तितके वाढे,
सर्वत्र सर्वच क्षेत्रात उपलब्ध
चराचरात ज्ञान,
निसर्गात माणसात यंत्रात,
अन् ह्या ब्रह्मांडात
कल्पनेच्या पलीकडे हे ज्ञान,
क्षणोक्षणी बदले इथे,
कधी काळी महाकाय ग्रह
क्षणात होई नष्ट,
होई नव्या सृष्टीची निर्मिती,
लक्षावधी वर्षांचा तारा
होई त्याचे कृष्ण वलय,
खेचून घेई सर्वांना,
न राहू शके त्यापासून कोणी दूर
पक्षांचे हजारो प्रकार,
लाखो यंत्रे इथे उपलब्ध,
मानसशास्त्रात तर याहून सखोल
चमत्कारीक सर्व,
विचारांच्या तयार होई मज्जातंतू,
सुखाचे क्षण असे मेंदूच्या अगदी जवळ
शरीर शास्त्र असो की विज्ञान,
समुद्रातील सृष्टी,
प्रत्येक क्षेत्र अत्यंत सखोल
जणू महासागर,
उपविषय देखील तितकेच मोठे,
ज्ञान घेणे जणू उत्साहाचे कण,
मानवीय प्रगतीचा मानबिंदू
Pingback: आभासी खेळ – शिक्षणाचे तत्त्व - निकविता
ऑक्टोबर 22, 2025Pingback: शोधयंत्र व्यवस्थापन - निकविता
ऑक्टोबर 23, 2025