झाड

झाड

झाड दिसे सामान्य परी त्याचे महत्व अपार,
ऊन वारा पाऊस,
तरीही सदा हरित

देई फळे रसाळ,
देई सावली उन्हात,
अनेक जिवांचा निवारा त्यावर

पाने फुले अगदी ते स्वत: देखील,
न काहीच वाया जात,
प्रकाशापासून अन्न तयार करे,
स्वयंपूर्ण शब्दाचा जणू अर्थ

बहुपयोगी,
औषधी गुणधर्म त्यात,
अगदी पालापाचोळा देखील होई खत,
त्याच्या फळांच्या बियांमधून जन्म घेई त्याचेच रूप

अगदी समुद्राच्या जरी असेल किनाऱ्यावर नारळाचे झाड,
परी त्यात गोड पाणी,
काही झाडे अशी की त्यात हजारो लीटर पाणी ठेवण्याची क्षमता त्यात

प्रत्येक झाडाची वेगळीच कथा,
प्रत्येक झाडाचे वेगळे वैशिष्ट्य,
वाळवंट असो की समुद्र

वा असो नदीकाठाचा परिसर,
सर्वत्र सहज दिसे,
घेई अप्राण वायु

झाड देई प्राणवायू सर्वाना,
देई उत्साह,
जणू जीवनाचा अर्क जाणला यांनी

साधू संत या जगीचे,
सांगे कसे जगावे जीवन,
सृष्टीचे रुपक

No Comments
Post a comment