झाडांची पाने
नाना रंग,
नाना आकार,
झाडांची पाने जणू एक आविष्कार
लहान असो की मोठे,
आकार कधीही न चुके,
तेच गुणोत्तर तोच आकार
जणू एकच साचे,
सर्वांगीण उपयोगी,
अगदी पाचोळा झाला तरी उपयोगाचे
काही खाण्यासाठी,
काही औषधांसाठी,
काही अगदी जेवणाचे ताट म्हणून येई उपयोगास
प्रकाशापासून अन्न तयार करती,
आला वारा तर सळसळ करती,
काही जिवांचे तर तेच अन्न असती
गवताचे, झाडाचे, फुलांचे अन वेलीची पाने,
हजारो रंग त्यांना,
तेही रंग बदलती
सूक्ष्म जीव असो दवबिंदु,
त्यावर वसती,
गळून जाता शुष्क होती
जमिनीत जाऊन खत होऊन पुन्हा मातीचा पोत वाढवती,
अखंड यांचे जीवनाचे चक्र,
जणू जगण्याचा अर्थ सांगती
झाडांची पाने साधे सरळ,
परी विज्ञानाला अचंबित करती
0 Comments