झाडांच पान

झाडांच पान

झाडांच पान दिसे साधे,
परी त्यात किती वैविध्य असे,
कुणाचे खाद्य

कुणाचा औषधी वापर,
कुणाचे ताट म्हणून उपयोग,
अन झाडांसाठी अन्नासाठी कार्य करे

नाजुक त्याच्या तंतू,
त्यातून प्रकाशाचे अन्नात होई रूपांतर,
किती पुढारलेले तंत्रज्ञान हे

गळून पडता होई खत त्याचे,
वाढवे कस धरणीचा,
झाडांना पोषक असे

किती त्यांचे प्रकार,
किती त्यांचे आकार,
परी सर्वांचे प्रमाण समान असे

काही पाने पाण्यावर तरंगतात,
पाण्यावर असूनही न सडे,
प्रत्येकात एक गुणधर्म

काही पाने जेवणात,
काही जेवणानंतर खातात,
जितके खोलात जाऊ तितके नवे विश्व उलगडे

झाडांचे पान प्रत्येकाचे नाना रंग,
काही लहान असतांना वेगळे अन मोठे झाल्यावर वेगळे रूप घेतात,
चरचारचे उदरभरणास सहाय्यक होतात,
एक नवे जगच त्यांचे असे

No Comments
Post a comment