झाडे
झाडे पृथ्वीचे रक्षक,
सदा हरित,
सदा उत्साही
पाहता यांना उत्साह येई,
ऊन वारा पावसाचा मारा,
न आडोसा सदा सर्वदा बाहेर
तरी सदैव आनंदित,
वाऱ्या संगे डुले,
उन्हात चमके
देई फळे रसाळ,
देई प्राणवायू,
देई सावली
अगदी त्याचे पाने देखील उपयोगी,
जरी जमिनीत मिसळले तरी त्याचे खत होई,
औषधी आणि जीव त्यावर वसती
परी सदैव हरित आनंदात,
जणू जीवनाचा अर्क जाणला त्यांनी,
न त्रागा न त्रास कोणता यांना होई
जणू ऋषीमुनी या धरणीचे,
सर्वच जणू जाणती,
कसे जगावे जीवन याचे जगून एक वास्तूपाठ निर्मिती
0 Comments