ढग
हे ढग स्वातंत्र्याचे प्रतीक,
सदैव सुखात,
हवे तेंव्हा हवे ते करतात
नाना यांचे रंग,
नाना यांची रूप,
कधी पांढरे
कधी सोनेरी,
कधी काळेकुट्ट,
नाना यांचे आकार
जणू नभ घेई कापासचे पीक,
हवे तिथे भ्रमण करतात,
वारा अन झाडे याचे मित्र
वाऱ्यासंगे फिरतात,
झाडे दिसल्यावर थांबतात,
आले मनात तर मनसोक्त कोसळतात
रिते झाल्यावर पुढच्या प्रवासाला निघतात,
कधी वाटले तर एकमेकात मिसळतात,
कधी विरून देखील जातात
बाष्पीभवनाने पुन्हा तयार होतात,
ऋतुचक्र यांच्याचमुळे चाले,
कधी सूर्याला देखील झाकून टाकतात
पाहून यांना मन होई प्रसन्न,
आनंदाचे कारण हे ढग,
नभाच्या रंगमंचावर आपली कला सादर करतात
कधी एकमेकांचे घर्षण करून विजेची निर्मिती करतात,
कधी गडगडात ऐसे करे जणू चालले युद्धास,
नभ स्वातंत्र्य उपभोगणारे जीव
0 Comments