देव
देव एक गंमतीदार गोष्ट,
न दिसे कुठेच,
श्रद्धा मात्र अपार
कितीतरी रुपे त्याची,
स्तुतीसुमने त्यावरी अर्पण करतो प्रत्येकजण,
काहींना येई परिचय
परंतु एक अगम्य कोड,
अडीअडचणीत देई अनुभव,
त्यामुळे लोकांची श्रद्धा अधिक
कुणास दिसे स्वप्नात,
कुणास दगडात,
कुणास निसर्गात
कुणी अनुभवे चमत्कारत,
असतो अन नसतो,
विज्ञानास देखील कोडे
यज्ञ अन स्तोत्रे,
देवळे अन आरत्या,
सगळे त्यासाठी चाले
त्यावर कथा अन पुराणे अधिक,
त्यात नाना गोष्टी चमत्कारिक,
अनेकांना याची थट्टा वाटे
परी अस्तित्व अमान्य तरी करावे कसे?
मग ही सृष्टी नेमकी उत्पन्न झाली कशी?
याचे कोडे न उलगडे
मनाच्या शक्तीचे दुसरे रूप,
ज्यास म्हणतो आपण देव,
एकाग्र करतो मन
लक्ष केंद्रीत करण्यासाठी त्यास आकार,
मनात राही ते रूप,
आठवून मग मन निर्मिती विद्युत तंतू
भाव करती रासायनिक चुंबक,
अन मग हे भाव प्रत्यक्षात सृष्टीत करती बदल,
अन आपल्यास वाटे हा चमत्कार,
साधे सरळ विज्ञान