ध्येय – एक प्रवास
ध्येय प्रत्येकाचे,
कुणाचे पैसे,
कुणाचे इमले
कुणाची पदवी,
कुणाची अन्य काही,
प्रत्येकाने बाळगलेले असते ध्येय
प्रत्येकजण त्यासाठी धडपडे,
ध्यानी मनी स्वप्नी तेच दिसे,
त्यासाठी जणू जीवन
तेच देई जीवनाला अर्थ,
तोच खराखुरा जीवनाचा प्रवास,
त्यामुळेच जीवनात आनंद
साध्य करता आयुष्याला मिळे कलाटणी,
त्यापेक्षा अधिक काही नाही,
जणू जीवनाची दिशा
अर्थहीन जीवनाला एक दृष्टी,
आनंदाचा जणू एक मार्ग,
जिथे भेटे सुख
ध्येयविहीन जीवन जणू आयुष्याचा अपव्यय,
येतात अडचणी,
उभी ठाके आव्हाने
परी त्यासाठी जीव तळमळे,
त्याखेरीज न दुसरे सुख मोठे,
एक सुखाचा प्रवास
ध्येय जणू जीवनाचे अर्क,
ते साध्य होता सर्वकाही आनंद,
जीवनाचा खराखुरा प्रवास
0 Comments