पाऊस
पाऊस कोसळतो नभातून,
किती रम्य होई वातावरण,
चिंब होई धरणी
चिंब होई सृष्टी,
पानापानावर दवबिंदु,
चमके ऐसे जैसे मोती
वारा वाटे सुसाट,
वनराई डोले सुखात,
मोर फुलवी पिसारा
आनंदित होई क्षण सारा,
कोकिळा गाई गान,
सुखद होई वातावरण
इंद्रधनुष्य उतरे नभातून,
पक्षांची किलबिल,
जणू सृष्टीचा नवा जन्म जसा
सृष्टीचे चाले सुखद तांडव,
मातीचा गंध देई उल्हास,
पाऊस पडून गेल्यावर येई कोवळ्या उन्हाचा आनंद
0 Comments