पृथ्वी

पृथ्वी

अनंतकोटी ब्रह्मांडे,
त्यात अगणित आकाशगंगा अन सूर्यमालिका,
पृथ्वी मात्र यात एकच

अगणित ग्रह अन काही हजार ग्रह जिथे जीवनास योग्य,
परी मानवास मुक्तपणे जगण्यास हा एकमेव ग्रह,
सगळेच अगदी योग्य प्रमाणात

पाण्याचे अन सूर्यापासूनचे अंतर,
उत्तम हवामान अन माती,
अब्जावधी मनुष्य इथे करे वास

मनुष्याचे स्वर्ग म्हणजे ही धरणी,
देई फळ अन अन्न,
नाना प्राणी अन निसर्ग

नाना ऋतु अन खंड,
प्रत्येकात काहीतरी नाविन्य,
काहीतरी विलक्षण

कुठे गरम पाण्याचे झरे,
कुठे बर्फाच्छादित प्रदेश,
कुठे हिमनगांचा प्रांत

कुठे रणारणते वाळवंट,
कुठे वनच वन,
जितके शोधल तितके थोडे

रमणीय ही सृष्टी ठरे,
आकाश त्यात रंग भरे,
नाना खनिजे अन रत्ने दडलेली,
पृथ्वी सगळ्यांचा सांभाळ करे

No Comments
Post a comment