पोषण
पोषण करे सहाय्य,
वाढण्यास मदत,
सकस अन्न हे उत्तम साधन
फळे पालेभाज्या अन दुधाचे पदार्थ,
डाळी कडधान्ये अन तृणधान्ये,
सगळेच देई शक्ती अपार
दोन वेळचे जेवण,
काढे झीज भरून,
शक्तीसाठी मात्र हा सकस आहार
जो करी पोषण,
शक्तीसंपन्न रोगराईस अवरोधान,
न येई कोणता आजार
निरोगी आयुष्य स्वर्गाचे दार,
आर्थिक दृष्टीने अन लौकिक अर्थाने सर्वोत्तम मार्ग,
सुखी जीवनाचा मंत्र
पोषक आहार सदा हितकारक,
अबरचबर अन्न केवळ उदरभरण,
सामर्थ्य हेच जीवन
त्यासाठी जे जे आवश्यक,
ते ते करावे परिश्रमपूर्वक,
सुखी होई प्रत्येक क्षण
अनेकदा वाटे कंटाळवाणे,
चवदार अन्न प्रिय वाटे,
परी साधे सरळ उत्तम
0 Comments