प्रवास

प्रवास

प्रवास एक अनुभव,
शिकण्याचा अन माहिती घेण्याचा काळ,
दोन ठिकाणांमधील असो की कुठल्या कार्यतील

देई माहिती गोष्टींची,
चांगले असोत की वाईट येई अनुभव,
कधी येई अडचणी

कधी होई सुखद,
दोन्हीही प्रसंगात येई ज्ञान,
होई सुधारणा आपल्यात

मिळे आनंद वाढे उत्साह,
नाविण्याची सदैव कास,
पाहता येई लोकांचे स्वभाव

कळे फरक गोष्टींमधला,
येई अडचणी निघे मार्ग,
बोध होई गोष्टींचा

प्रवास जणू ज्ञानाचा सागर,
कधी चढ कधी उतार,
कधी मार्ग न दिसे अंधारून जाई सर्व

त्यातून दिसे मग सूर्यकिरण,
वाढे सामर्थ्य वाढे सहनशक्ती त्यातून,
कळे आयुष्याचे गणित

काळाचा वेळेचा विषय,
धाडस येई अधिक,
सहज अन सुंदर बाब

असो जीवनाचा की दोन ठिकाणांचा,
देई सुख देई आनंद,
उत्साहाचा अनुभव

Post a comment