फळे
फळे रसाळ गोमटी,
खाता त्यांस येती सुखाची अनुभूती,
चविष्ट परी शक्तीवर्धक
जणू देवाने दिलेले शक्तीचे फळ,
देई ऊर्जा लगेच,
पचनास देखील सहज
येई अंगी बळ,
उत्साहाचे कारण,
आंबा पेरू चिंच सफरचंद
संत्री मोसंबी केळी फणस अननस,
बोर नारळ खारीक सीताफळ अन रामफळ कलिंगड टरबूज खरबूज,
खा कोणतेही बळ प्रत्येकात
शरीरात लागणारे त्यात सारे घटक,
सुखी जीवनाचा रसाळ मंत्र,
रोगप्रतिकारक शक्ती वाढे अपार
देवाने दिलेले वरदान,
रोजचे जेवण भरून काढे झीज,
बळासाठी आवश्यक फळ
आरोग्यासाठी महत्वाचे,
अगदी वेष्टण करून समोर,
खाणाऱ्यास जणू आनंदाची गोष्ट
प्रत्येक ऋतुत वेगळी फळ,
वेगळी चव,
सुखद अनुभव
कितीही खा,
न कोणता अपाय,
निरोगी जीवनाचा उपाय ही फळे
Pingback: सांघिक कार्य ही शक्ती - निकविता
ऑक्टोबर 16, 2025