मतदान

मतदान

लोकशाहीचा पाया मतदान,
त्यावरून ठरे लोकशाही किती निकोप,
सर्वांना समान अधिकारचे जिवंत रुपक

लोकांचे राज्य,
लोकांना राज्यकर्ते निवडण्याचा अधिकार,
मत व्यक्त करण्याची मुभा

समर्थन टीका करण्यास स्वातंत्र्य,
त्यावर आणता बंधन एकूणच व्यवस्थेवर प्रश्न चिन्ह,
प्रश्न विचारण्याचा अधिकार

काहीसे भासे सामान्य वचन,
जगातील एक चतुर्थांश राष्ट्रात न हे अधिकार,
त्यावरून लक्षात येई महत्व

प्रश्नाला अन अडचणींना शासन जबाबदार,
त्याचेच तर भरतो नागरिक,
नसेल तो समाधानी तर यंत्रणा सदोष

विश्वास निर्माण करण्याची जबाबदारी यंत्रणेवर,
पारदर्शक व्हावी यासाठी आत्यंतिक महत्व,
असावे असे तरच त्या लोकशाहीला अर्थ

नाहीतर केवळ एक नाटक,
निवडणूक आणि त्यावर मतदान,
तेच त्याचे द्योतक

No Comments
Post a comment