माणसांचे स्वभाव
जितक्या व्यक्ती तितक्या प्रकृती,
माणसांचे स्वभाव रंगाइतके विविध,
कुणी सरळ कुणी लबाड
कुणी भांडकुदळ कुणी शांत,
कुणी उगाच सैराट,
कुणी बोलके कुणी अबोल
कुणी हसरे कुणी रुक्ष,
कुणी अभ्यासू कुणी उथळ,
कुणी समजूतदार कुणी खुशालचेंडू
स्वभाव अशी गोष्ट,
जी न बदले सहजासहजी लगेच,
स्वयंस्फूर्ती असावी लागे
मगच तो बदल घडे,
अशक्य शब्दाच्या जवळपासची गोष्ट,
ओळखावे स्वभाव मग योजावी कृती
तेच योग्य तोच मार्ग,
त्यावरच ठरे मानवी आयुष्य,
सगळ्यांना आपण आणि सगळ्यांशी आपले पटेल असे नसते काही
अनुभव अन परिस्थिती घडवे स्वभाव,
गुण अवगुण प्रत्येकात,
ते पाहून व्यवहार असावा
न सगळेच शहाणे न वेडे,
अर्ध शहाणे अर्ध वेडे देखील असतात जगी,
सहज निरीक्षणान देखील ध्यानी येई
0 Comments