यादीचे महत्व
यादीचे महत्व अपार,
गोष्टीच्या नोंदी,
वा कामाची यादी
देई जाणीव करून कार्याची,
न विसरे काही,
होई कार्ये सहज
वेळेचा देई होई सदुपयोग,
न कठीण न कोणत्या विशिष्ट गोष्टींची गरज,
न कोणता नियम अटी नी कोणती रूपरेषा
एकाखाली एक लिहा गोष्टीची नावे,
जसे जसे होईल पूर्ण ते करा बरोबरची खूण,
वा मारा आडवी रेषा त्यावर
सगळ स्वातंत्र्य आपणास,
ठरवलेल्या गोष्टी असती डोळ्यासमोर,
त्यामुळे विसरण्याचा प्रश्नच न उभा राही कुठेच
कागद असो की वही,
वा असो संगणकीय नोंद,
सर्वकाही चाले साधी सरळ गोष्ट
यादीचे महत्व अधिक,
त्यामुळेच सर्वत्र कामकाजात याचा होई वापर,
लहानसे परी कल्पक बाब
0 Comments