वस्त्रे – एक अलंकार

वस्त्रे

वस्त्रे कधीकाळी होती शरीर झाकण्याचे साधन,
आता झाले प्रचलनाचे कारण,
नाना रंगात

नाना प्रकारात अनेक कपडे उपलब्ध,
शिवण्याची देखील न गरज राहिली,
व्यक्तिमत्व उजळवण्याचा मार्ग

सुंदर नक्षी,
सुंदर चकाकी,
काही कपडे असे की इस्त्री देखील पुन्हा करण्याची गरज नाही

वाटे सामान्य बाब परी ओळख ठरवे आपली,
आपल्या विचारांचे जणू मूर्त रूप ही,
स्वस्त अन महाग सगळ्या प्रकारात उपलब्ध ही

हवे ते रंग,
हव्या त्या नक्षीत देखील तयार करणे शक्य,
प्रचार आणि प्रसिद्धीचे साधन

No Comments
Post a comment