विदा
दैनंदिन जीवनातील महत्वाची गोष्ट,
जसे जळ तसे काहीसे विदा,
विदावर चाले आजकाल सर्वच
प्रत्येक गोष्टीची माहिती आभासी रीतीने जोडलेली दुरावरील साठा केंद्रावर,
अनेक उपयोजक अन संकेतस्थळे देखील करे कार्ये तसेच,
त्यामुळे विदा अत्यंत आवश्यक बाब
आर्थिक व्यवहार असोत की मनोरंजन,
वा जागतिक व्यासपीठ वा असोत शाळेची नोंदणी,
प्रत्येक ठिकाणी होई आभासी व्यवहार
रुग्णावर शस्त्रक्रिया देखील चाले थेट दुरदृश्य प्रणाली द्वारे,
परदेशातील वैद्य करे तपासणी अन निरीक्षण,
देव देखील आता थेट भेटतात
सगळीकडे आता आभासी गोष्टींचा गजबजाट,
त्यामुळे विदाची मागणी अफाट,
जीवनातील जवळपास प्रत्येक घडामोडीची नोंद तिथे
त्यासाठी आता विदाची गरज अधिक,
न चांगले वाईट काहीच,
जीवनमान उंचावले तशा गरजा देखील बदलल्या इतकेच
0 Comments