वेळ
वेळ एक परिमाण,
जणू जीवनाचा समभाग,
ज्याने तोलता येई प्रत्येक क्षण
न त्यासाठी काही करावे लागे,
ती अचूक,
न भेदभाव कसला सर्वांना समान न्याय
कुणासाठी न थांबे कधीच,
अचूक काळात पुढे जाई सहज,
न कोणती शक्ती अडवू शके
ती स्वत: स्वत:ची ईश्वर,
तिच्याशी बरोबरी एक मोठा विजय,
तिच्याशी स्पर्धा देखील मोठी बाब
तिच्या पुढे जाणे म्हणजे जयदीपक,
सातत्याने पुढे असणे जणू ईश्वराचे रूप,
जशी वाहती नदी चाले अखंड
न थांबे चाले अव्याहत,
आला अडथळा जाई त्यास वळसा घालून,
तसे काहीसे वेळेचे देखील
चाले अव्याहत,
अगदी आडवा आला ग्रह तारे वा कृष्णवलय,
घेई वळसा जाई पुढे
मानवी क्षमतेच्या अधिक,
देता महत्व तिला ती देखील देई महत्व,
एक आदर्श
0 Comments