शिस्त

शिस्त महत्वाची गोष्ट,
अंगीकार करता येई जीवनास आकार,
अचूक अन भविष्य देखील हातात

ठरलेल्या गोष्टी जागेवर ठेवणे,
वेळच्या वेळी गोष्टी करणे,
आखून दिलेल्या नियमात राहणे

दिसे सामान्य बाब परी कठीण,
दंडक पाळणे अन त्यातील सातत्य कठीण,
जितके कठीण तितके हितवाह

लहान लहान गोष्टी घडवे मोठे बदल,
अगदी उदाहरण म्हणून पाळले वाहतुकीचे नियम,
तरी सहज बदलेल दैनंदिन जीवनातील बराचसा ताण

वैयक्तिक पातळीवर,
जीवनातील सर्वच गोष्टींमध्ये शिस्तीचे पालन मोठी गोष्ट,
आर्थिक शिस्त देई आर्थिक वाढावे क्रयशक्ती

व्यायामची शिस्त देई देहास आकार,
सुदृढ शरीर यशाचे कोंदण,
काय लागे यासाठी?

मनाचा निग्रह,
एक पण तो देई जीवनाला आकार,
व्यक्तिमत्व विकास अन सुकर जीवन

कितीही अन कोणतेही महान व्यक्तिमत्व शोधा,
त्यात देखील सापडेल हा गुण,
सर्वोत्तम गुणांपैकी एक

कशाची असावी शिस्त?
ते आपल्यावर,
प्रत्येक गोष्टीत शिस्तीची गरज

No Comments
Post a comment