शेतकरी उद्योजक

शेतकरी

शेती एक व्यवसाय,
त्याअर्थाने शेतकरी उद्योजक,
करे अन्नधान्याचे उत्पादन

पिकवी पालेभाज्या,
करे फळे अन कडधान्ये,
जीवनाचा जणू निर्माता अन रक्षक

शेतीसाठी लागणारी खते,
मशागत अन पाण्याची करे सोय,
करे श्रम अधिक

देशाचा मुळाधार,
त्यावर उभे राही देश,
अर्थव्यवस्था त्यावर वाढे

येती संकटे निसर्गाची,
बाजारपेठेची आव्हान,
दलालवर्गाचे शोषण

सिद्ध होई तरी,
कधी शासन कधी कधी विमा संस्था शत्रू होई,
तरीही एखाद्या योध्याप्रमाणे तो लढाऊ

लढे अन पिकवी अन्नधान्य,
कधी कर्जाचा बोजा वाढे,
कधी दुष्काळ

कधी ओला दुष्काळ,
त्याचा उद्योग जणू आव्हानांचा,
त्यातून मार्ग काढी

हरहुन्नरी अर्थ श्रमाची गाथा,
शेतकरी म्हणजे लढाऊ उद्योगाची गाथा,
मातीतून येणाऱ्या सोन्याचा धनी

No Comments
Post a comment