संगणक

संगणक

संगणक जीवनातील अविभाज्य भाग,
स्वयंचलित वाहने,
स्वयंचलित विमाने

चाणाक्ष घडयाळ अन अत्याधुनिक दूरदर्शन संच,
फुलणक अन द्रोण,
सगळी संगणकाचीच रुपे

कृत्रिम बुद्धिमत्ता देखील त्याचीच अंग,
अगदी स्वयंचलित आली शेती अन कारखान्यातील यंत्रे,
अवकाशात फिरणारे उपग्रह

सगळे त्याचाच भाग,
जागतिक घड्याळे असोत की अन्य,
बिनतारी संदेश यंत्रणा

तेच सांभाळे सर्व आर्थिक व्यवहार,
आपण केवळ निरीक्षक,
सुचवी बदल करे सुधारणा

आभासी खेळ असो की बुद्धीचे कार्य,
अगदी युद्धे देखील,
करी सर्व कार्य

यंत्रमानव देखील संगणकच,
तोही करे मानवी कार्ये,
करे ताण हलका

समुद्रातील स्वयंचलित जहाजे देखील तेच,
स्वच्छता करणारे यंत्र,
कपडे धुणारे यंत्र अन शितगृह

सगळीकडे तेच करे कार्य,
आता इमारती बांधकामात देखील करे सहाय्य,
शस्त्रक्रियेत देखील करे सहकार्य

हातातील भ्रमणयोजक देखील संगणक,
सदैव सोबती,
करे नाना कार्य जीवनशैलीचा भाग

No Comments
Post a comment