समाज माध्यमे
समाज माध्यमे या युगातील सर्वात बलाढ्य,
जाहिरातदार संस्थांनी निर्मिली स्वतःची यंत्रणा,
करण्या जाहिरातीचे नियमन
न रस्त्यावर फलक,
न दुसंचावर कोणती जाहिरात,
परी प्रत्येकाच्या भ्रमणयोजकात अन डोक्यात
प्रत्येकजण यावर,
दिवसाला प्रत्येकाचा ताशी तीन तास वापर,
यापेक्षा मोठे आजच्या घडीला न काहीच
कुणाला प्रसिद्धी,
कुणा करता येई जाहिरात,
कुणी करे यावर प्रचार
तारका राजकारणी पुढारी अन खेळाडू,
सारेच इथे वसे,
एक आभासी जगच निर्माण झाले इथे
मुक्त व्यासपीठ,
हवे ते व्यक्त व्हा,
गप्पा मारा यथेच्छ
सामान्य कल्पना परी सर्वांच्याच आवाक्यातील,
अनेक ठिकाणी तीही मुभा नसे,
त्यामुळे आकर्षिले जाती अनेकजण
व्यावसायिक देखील कसे मागे राहतील?
तेही त्यांच्या जाहिराती इथे करे,
अशा रीतीने जाहिरातदार संस्था आपले आर्थिक चक्र पूर्ण करे
0 Comments