सहकार्य

सहकार्य

सहकार्य मोठा गुण,
पुण्याचे काम,
करता सहकार्य होई आनंदाचा अनुभव

अनेकदा लहानसे काम,
परी येई नाना अडचण,
एखादा असे कुशल

काहींना लागे मदतीची गरज,
करता ती क्षणिक मदत,
कार्य होई सफळ

सहकारी होई आनंदित,
एक उत्तम गुण,
जसे देई तसे मिळे

यामुळे हा गुण देई अधिक,
जाणीव देखील ठेवे समोरचा,
आपल्याबद्दल तोही राही सकारात्मक

काळ वेळ बदले,
कधी आपल्यास देखील पडे गरज,
त्यामुळे त्यावेळी होई सहज

न कठीण न फार मोठा विषय,
परी झरझर होई कार्ये,
प्रश्न सुटे होई मंगळ

जरी भासे वेळ दवडे,
तरी शक्य ते सर्व करावे,
सकळ जणांना सहाय्यक व्हावे

उभारी देई व्यक्तिमत्वास,
सकारात्मक ऊर्जा पसरे वातावरणात,
सांघिक कार्यासाठी आवश्यक

No Comments
Post a comment