स्वच्छता

स्वच्छता

स्वच्छता महत्वाची गोष्ट,
शरीर असो की परिसर,
होई निर्मळ

आनंदाचे क्षण,
भरे प्रकाशकण उजळे अधिक,
सहज सोपी परी बदले वातावरण

येई नाविण्य गोष्टीस,
उत्साह वाढे अधिक,
पावित्र्य उठून दिसे ठळक

आरोग्य कोंदण,
निरोगी होई शरीर,
निरोगी परिसर

न होई कोणते आजार,
वाढे आयुष्य,
वाढे सुखाचे क्षण

युगानुयुगे गेला काळ,
कितीतरी आल्या अन गेल्या संस्कृती अनेक,
परी स्वच्छतेचे महत्व प्रत्येकात विशद

धार्मिक असो की वैज्ञानिक दृष्टिकोण,
सगळीकडे ह्यास प्राधान्य,
देऊळ असो की रुग्णालय

घर असो की शहरातील परिसर,
सगळीकडे याचे पालन,
पुढारलेल्या समाज अन समाजमानस

एक उत्तम गुण,
जो देई बक्षीस ताबडतोप,
उत्तम जीवनाचा प्रवास

No Comments
Post a comment