उद्योग करे प्रत्येकजण, ज्यात ज्याला रस, ज्यात होई उदरभरण ते करे सर्वजण नोकरी हाही एक प्रकारचा व्यवसाय, काही ठराविक कामांचा अन काही ठराविक तासांचा व्यवसाय,

तर्क शक्ती महत्त्वाची, येई करता तुलना येई करता विश्लेषण, एखाद्या गोष्टीला असे अनेक कंगोरे काय फायद्याचे? काय तोट्याचे? याची उकल करण्यासाठी हवी तर्क दृष्टी

आठवड्यांचे वार, सोमवारी प्रभात नवी, उमलती कर्तृत्वाची चाहूल, हातात ध्येयाची वाट मंगळवारी जोम वाढतो, कष्टांच्या ओघात दिवस सरतो, नवी उमेद उभी राहते