वाहतूक दिवे
वाहतूक दिवे रस्त्याच्या चौकांत उभे, त्रिवर्णी तेजाचे स्तंभ, वाहतुकीचे मार्गदर्शक लाल दिवा थांबवितो, शांततेचा इशारा देतो, गर्दीला थोडा विराम पिवळा दिवा कुजबुजतो, सावधानतेची चाहूल देतो, क्षणभर मनाला सजग करतो
ज्ञान
ज्ञानाचे भांडार चोहीकडे, ज्ञान जितके घेईल तितके वाढे, सर्वत्र सर्वच क्षेत्रात उपलब्ध चराचरात ज्ञान, निसर्गात माणसात यंत्रात, अन् ह्या ब्रह्मांडात
सूर्य
नभात येतात सोनेरी किरण, होई आसमंत सोनेरी, सरे रात्र येई सूर्य आकाशी होई सकाळ सुरू होईल जीवनचक्र, पक्षांचे किलबिलाट, चराचर सुरू करे आपले कार्य
झाड
झाड दिसे सामान्य परी त्याचे महत्व अपार, ऊन वारा पाऊस, तरीही सदा हरित देई फळे रसाळ, देई सावली उन्हात, अनेक जिवांचा निवारा त्यावर पाने फुले अगदी ते स्वत: देखील, न काहीच वाया जात, प्रकाशापासून अन्न तयार करे, स्वयंपूर्ण शब्दाचा जणू अर्थ बहुपयोगी, औषधी गुणधर्म त्यात, अगदी पालापाचोळा देखील होई खत, त्याच्या फळांच्या बियांमधून
गणपती
गणपती बुद्धीचा देव, गणांचा अधिपती, प्रथम देव गजस्वरूप सर्वांचा लाडका, पुजिला जातो सर्वात आधी, तो त्याचा बहुमान सुंदर ते वदन, आनंददायी त्याचे आगमन, महाराष्ट्राच दैवत नाना रूपात अवतरे, नाना प्रकारे त्याचे पूजन, नसे कोणते बंधन जाणावे त्याचे अस्तित्व, घरोघरी त्याचे पूजन, सुखाकर्ता दुखाहर्ता शब्दश: सोबत येई हत्ती नक्षत्र, धो धो कोसळे पाऊस, रमणीय वातावरण लंबोदर त्याचे लंब उदर, देवाचे