कला कल्पक अन सृजनशील प्रांत, जिथे आनंदाचा अन चैतन्याचा वास, सकारात्मक ऊर्जा कल्पनेतून चित्र उतरे, कलेतून नाना शिल्प घडे, कुणी मूर्ती घडवे कुणी नृत्य सादर करे,

उद्योजक स्वप्न पेरतो, नवा मार्ग शोधीत, धाडसी पाऊल टाकतो, अडथळ्यांच्या पलीकडे, चिकाटीने जग घडवी, दृढतेच्या छायेखाली कल्पनांची बीजे रुजती, आशेच्या मातीत, उद्योजक मन फुलवी, कर्तृत्वाच्या तेजात, नवनिर्मितीची ओढ जागे, श्रमसाध्य प्रवासात परिश्रमांच्या रेषा उमटती, हातांच्या धारेत, घामाच्या थेंबात दिसते, स्वप्नांची चमक, मनोबल उभे, वादळांमध्येही स्थिर वाटा किती कठीण, तरीही