एकाग्रता

एकाग्रता एक महत्वाची गोष्ट,
एकाग्रतेमुळे काम सोपे होते,
होई कार्ये सहज

वेळ होई संथ,
वाढे कामाचा वेग,
न येई अधिक ताण

चाले सर्व सुरळीत,
एकाग्रता जणू एक सिध्दी,
जी वेळेला देखील मागे टाकू शके

काय लागे यासाठी?
साधे सरळ विषयात लक्ष,
अनेकदा येई व्यत्यय

याने होई गोंधळ,
न केंद्रित करू शके कामावर लक्ष,
काम देखील होऊ न शके वेगात

त्यासाठी एकाग्रता महत्त्वाची,
हो, तुम्हाला सहज प्रसिद्धी मिळेल,
एका वेळी एकच कार्य

काही जणांना जमे एकावेळी करणे अनेक गोष्टींवर कार्य,
ते एक मोठे प्राविण्य,
पण दर्जेदार काम हवे असल्यास एकावेळी एकच

ज्याच्या ठायी वसे,
तो यशाला गवसणी घाले,
वेळेत होती गोष्टी अन जीवनाचा तो परिपूर्ण रास तो घेई

No Comments
Post a comment