मनोबल

मनोबल

मनोबल सर्वात मोठे बळ,
ठरवले मनाने तर सर्वकाही शक्य,
क्षणात इथे क्षणात तिथे

मनास न कोणती सीमा,
मनास न कोणी अडवू शके,
मन जणू परम तत्वाचा भाग

मन जणू सूक्ष्म शरीर,
हवे तिथे जाऊ शके,
हवे ते करू शके

मनात येई विचार,
अन मग घडे कृती,
हा साधा सरळ धोपट मार्ग

मनाने ठरवले तर तो जणू ईश्वर,
नाना सिद्धी त्याजवळ,
फक्त कोणी न त्याकडे हवे तितकेसे लक्ष देत

त्यामुळे श्रम अधिक,
यश भेटे काहीसे,
त्याच्या विरुद्ध कार्य मग त्रास अधिक

काहीजण घाले मनास वेसण,
जणू एखादा बैल,
पर त्यास करता प्रसन्न
 
तो सिद्ध करून देई हवे ते काही क्षणात,
असीम शक्तीचा स्त्रोत,
फक्त त्यास प्रसन्न करणे जमणे एक कलाच
 
मग तो अचाट गोष्टी करी,
मनोबल, त्यात सृष्टी बदलण्याची त्यात शक्ती,
वाटे अतिशयोक्ती परी हेच सत्य
No Comments
Post a comment