खेळणी
मानवाच्या कल्पकेतेचे मूर्त स्वरूप ही खेळणी,
दिसे सामान्य परी असामान्य त्याचे कार्य,
शिक्षणाचे सर्वोत्तम साधन
न शिकवावे लागे,
न सांगावे लागे,
अगदी न बोलता येणाऱ्या चिमुकल्या जीवाला कळे
तासनतास मन गुंतून पडे,
आनंद अपार,
न कंटाळा येई त्याचा
कल्पकतेचा अन सृजनशीलतेचा उत्तम नमूना,
मन होई प्रफुल्लित,
सर्व सिद्धीचे कारण
झोका असो की घसरगुंडी,
पतंग असो की बुद्धिबळ,
पत्ते असोत की व्यापार
बुद्धीस चालना,
एकाग्रता वाढे सहज,
जोडणी अन नकाशा
आवडेल ते खेळ खेळा,
विटी दांडू लहानशी मोटर,
ट्रॅक्टर अन मनुष्याचा सापळा
कितीतरी खेळणी उपलब्ध,
त्यांचेही स्वत:चे एक जग,
तयार करणे हाही एक उद्योग
तो एक मोठा वेगळा विषय,
मानवी बुद्धीचा परिपाक,
एक उत्तम साधन
0 Comments