तर्क
तर्क शक्ती महत्त्वाची,
येई करता तुलना येई करता विश्लेषण,
एखाद्या गोष्टीला असे अनेक कंगोरे
काय फायद्याचे?
काय तोट्याचे?
याची उकल करण्यासाठी हवी तर्क दृष्टी
त्रयस्थपणे करता आला विचार,
मग सर्व काही साध्य,
न लागे यापेक्षा अधिक
कल्पना करता येणे अन् त्याआधारे येणाऱ्या प्रश्नांचा विचार करता येणे,
म्हणेच तार्किक,
घडण्याआधी कळे
अंदाज लावता येणे,
असामान्य कलागुण,
भविष्याचा वेध घेता येई
येणारी आव्हाने पेलण्यासाठी सज्ज होता येई,
महापुरुष अन् धुरंधर योद्धे,
तेही काय वेगळे?
ह्याच मार्गाने करतात तेही विचार,
त्यामुळेच ते मार्गदर्शक,
घेई अचूक निर्णय
क्लिष्ट विचारांचा हा खेळ,
भासे जरी कठीण,
परी तसा जमण्यास सोपाच
युद्धनीती, राजकारण, विश्लेषक,
पुढारी अन अभियंता वा निरीक्षक,
सगळीकडे ह्या गुणाची गरज
0 Comments