वाहतूककोंडी
वाहतूककोंडी एक महत्वाचा विषय,
कोणत्याही शहरात जा,
प्रकर्षाने जाणवतो हा विषय
लोकसंख्या वाढली वाहने वाढली,
रस्त्यांच्या दुतर्फा अतिक्रमण करणाऱ्या रस्त्यावर विक्री करणाऱ्यांनी गर्दी केली,
वाहनतळ देखील अनेक ठिकाणी
मग वाहतुकीस येई अडथळा,
वाहतूक होई संथ,
मग आडवे तिडवे
उलथे पालथे येईल आडवे,
त्यांना पार करावे तर खड्डे करी स्वागत,
झाला सरळ सोपा मार्ग तर तुम्ही भाग्यवान
सगळ सगळे जाणतात,
कृती न झाल्याने चिघळलेला विषय,
एका सरळ रेषेत वाहने चालवली तरी त्रास कमी होऊ शकतो सहज
दोष न केवळ सामान्य जनतेचा,
रस्त्याच्या बाजूचे दुकानदार करे अडचण,
ग्राहकांना न उपलब्ध करून देई वाहनतळ
त्या इमारतीचे बांधकाम करतानाच जागेचा असे नियम,
मंजूरी भेटल्यावर वाहनतळ ऐवजी उभे करी ते गाळे,
अन खाऊ खाऊन शांत बसणारे अधिकारी देखील तितकेच दोषीच
साधा सरळ विषय,
नियम पाळले तर सर्वच प्रश्न सहज सुटेल,
इतर नाहीत मग आपल्याचकडे कसा इतका गंभीर विषय,
कृती हेच मूळ कारण अन उपाय
0 Comments