यादी
यादीचे महत्व अपार,
वाचवे वेळ न करावा लागे फार विचार,
हव्या त्या विषयाची यादी करणे शक्य
सामानाची, वस्तूंची, कामाची,
अनेकदा सहज विसरून जाई सोप्या गोष्टी,
कधी असे वेळ परी न आठवे तत्क्षणी
त्यावेळी यादीच कामास येई,
न विसरे काही,
ठरलेले कार्य होई पूर्ण
साधी सरळ,
न त्यासाठी अमक्या एक गोष्टीची गरज,
साधे वहीचे पान, संवही, सर्व काही मान्य
कशी असावी रचना ते आपल्यावर,
न त्यास कोणता नियम,
अगदी एकाखाली एक देखील उत्तम
हेतु साध्य होई इतकेच महत्वाचे,
बाकी सर्व गौण,
कितीही तंत्रज्ञान पुढे गेले तर यादीचे महत्व सदैव राहील
जणू अमरत्व प्राप्त झाले या विषयास,
असामान्य गोष्ट,
नियोजनात याचे विशेष महत्व
0 Comments