भ्रमणयोजक
भ्रमणयोजक एक उत्तम सहाय्यक,
पूर्वी धनाढ्य लोकांकडे असे मदतनीस,
तसा काहीसा हा भ्रमणयोजक
सांगाल ते कार्य करे,
कुणास संपर्क,
कुणास संदेश
एखादी गोष्ट शोधून देई,
एखाद्या ठिकाणाचा मार्ग दाखवी,
खेळ अन कार्यालयीन काम
कुणाशी थेट संपर्क,
नोंदी असो की वेळेवर आठवण,
वा काढायचे छायाचित्र वा चित्रफीत
तुम्ही सांगा ते सर्व करे,
न कशाला कंटाळा,
आज्ञाधारक
दिशामापक, होकायंत्र,
नाना याचे उपयोग,
जीवनातील सर्वच गोष्टींवर करी परिणाम
झटपट होई संपर्क,
न राहिली जागेची अडचण,
कळे सर्व गोष्टी एकमेकांना क्षणात
कामाचे देखील तसेच,
विपत्र पाठवायचा असो की हवे मनोरंजन,
वा नोंदणी करायची एखाद्या गोष्टीची
पाठवायचे पैसे अथवा करायचे आर्थिक व्यवहार,
तपासायचे आर्थिक व्यवहार,
वा हवी माहिती सर्व काही करे सहज
0 Comments