प्रकाश
प्रकाशाचे महत्व अपार,
प्रकाश देई ऊर्जा,
देई उत्साह
पडता सूर्याचे किरण दिवसाची होई सुरवात,
वनराई अन धरणी उजळून जाई,
फुले उमलती
पक्षांची किलबिल,
प्राण्यांचा वावर सुरू होई,
उल्हसित वातावरण होई
लोकांची कार्ये,
दुकान उघडे,
अर्थकारणाला चालना मिळे
रस्ते वाहनांनी फुलती,
दिनचक्र सुरू होई,
नभात नाना रंग
देई सुख,
वनराई त्या प्रकाशाचे अन्नात रूपांतर करी,
तोच प्रकाश पडता महासागरात पाण्याचे बाष्पीभवन होऊन त्यापासून ढगे तयार होई
ऋतुमान चक्र सुरू होई,
जिथे प्रकाशाचे कण,
तिथे ऊर्जा अन उत्साह
देवघरातील दिव्याचा प्रकाश,
माजघरातील सूर्याची किरणे,
देई नवा दृष्टिकोण अन प्रकाशमान होई जीवन
Pingback: ध्यान – अंतर्मनाचा प्रवास - निकविता
ऑक्टोबर 31, 2025