भ्रमणयोजक एक सहाय्यक
भ्रमणयोजक जणू एक सहाय्यक,
करे सर्व कार्ये,
करी काम सुकर
क्षणात देई हवे ते,
मनोरंजक असो की संपर्क,
नकाशा असो की हवामान
वा असो कार्यालयीन कार्य,
वेळेचे न कोणते बंधन,
अगदी विश्वासू अन खात्रीशीर
रस्ते दाखवी, ठिकाण शोधे,
नोंदणी चर्चा अन तक्रार,
संदेश वहन अन सूचनांचा भडिमार
बातम्या अन माहितीचे भांडार,
आभासी खेळ अन कोडी उपलब्ध,
अगदी देवदर्शन देखील थेट
पैसे पाठवणे अन आर्थिक व्यवहार,
किती पाऊले चाले ते मोजे,
किती धावलो अन किती घेतली झोप त्याचीही माहिती देई
प्रत्येक गोष्टीचे हयात उपयोजक,
ते जणू त्याच्यासाठी अस्त्र,
बोले अन प्रश्नांची देई उत्तरे
आठवण करून देई,
कामात सहाय्य करे,
शब्दश: सहाय्यक हा भ्रमणयोजक
0 Comments