प्रयत्न

नियोजन

प्रयत्न यशाचा मार्ग,
यश कधी भेटे सहज,
कधी करावी लागे मेहनत अधिक

अशक्य देखील करे शक्य,
कठीण देखील करे सहज,
प्रयत्न हा जणू विजयाचा मंत्र

काहींकडे असे अंगभूत गुण,
काहींना कमवावे लागे,
सगळ्याच क्षेत्रात नसे प्राविण्य कुणाकडे

त्यासाठी यत्न,
यत्न देई प्राविण्य,
देई यशाची खात्री

दुर्दम्य इच्छाशक्तीचे लक्षण,
पडल्यानंतर पुन्हा उठून उभा राहण्याची शक्ती,
प्रयत्नवादी घेई यशाचे पान

जसा गुरु देई ज्ञान,
दाखवी यशाचा मार्ग,
सांगा खाचाखोचा

तसे काहीसे यत्न करे,
इवलीशी चिमणी,
चोचीच्या सहाय्याने काड्यांचे घर उभे करे

शोधून दाणे आणे,
प्रयत्नवादाचे उत्तम उदाहरण,
सामान्य पासून असामान्य होण्याचा प्रवास

जणू एखादा तप,
करे कठीण परीक्षा उत्तीर्ण,
देई इच्छित गोष्ट तसे काहीसे

No Comments
Post a comment